December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

छत्री रंगवण्याच्या कार्यशाळेत रंगले विद्यार्थी

कल्याण

सुभेदार वाडा कट्टा आणि याज्ञवल्क्य यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील याज्ञवल्क्य या सभागृहात छत्री रंगवणे या कार्यशाळेचे व त्यासोबतच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कल्याण शहरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला या ६८ विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुनानक इंग्लिश हायस्कूलचे कलाशिक्षक तसेच कल्याण तालुका कलाध्यापक संघाचे सचिव विनोद शेलकर यांनी विद्यार्थ्यांना छत्रीवर रेखाटन कसे करावे, त्यासाठी लागणारे साहित्य, विभाजन, प्रपोर्शन रेखाटन आणि रंग कामाची पद्धत समजाऊन सांगितली.

अक्रलिक रंग आणि पोस्टर रंग यांच्यामध्ये असलेला वेगळेपणा, वापरण्याची पद्धती त्यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितली. विविध रंग छोटा रंग मधील विरोधाभास आणि योग्य रंगांची निवड करून परिणामकारक पद्धतीने आपण छत्री कशाप्रकारे रंगवू शकतो याचे मार्गदर्शन विनोद शेलकर यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी अम्ब्रेला आणि रंगाचा वापर करत विविधतापूर्ण रेखाटने करून अतिशय सुंदर रित्या छत्रीचे रंगकाम केले. शेवटी या रांगवलेल्या छत्री यातूनच परीक्षण करून बक्षिसे देण्यात आली.

यांनी पटकावला नंबर

विनोद शेलकर आणि प्रफुल्ल बोरसे यांनी परीक्षण केले. यामध्ये प्रथम गट – उज्वला माळी, सुभेदार वाडा विद्यालय – प्रथम क्रमांक, तन्मय चाटघोडे, ओक हायस्कूल- द्वितीय क्रमांक, जानवी कश्यप, शारदा मंदिर विद्यालय- तृतीय क्रमांक. द्वितीय गट – जानवी पाटील, शारदा मंदिर विद्यालय- प्रथम क्रमांक, अशोक राठोड, सुभेदार वाडा विद्यालय – द्वितीय क्रमांक, दीप सागवेकर, गजानन विद्यालय – तृतीय क्रमांक पटकावला.

बक्षीस वितरण गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजनासाठी सुभेदारवाडा कट्टाचे अध्यक्ष दीपक जोशी, अर्जुन पाटील यांनी योगदान दिले. कार्यक्रमास कला शिक्षक कैलास सरोदे तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.