कल्याण
ट्रक ड्रायव्हिंग करत असताना आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रवासात येणारे चांगले वाईट अनुभव “द ट्रकर एक प्रवास” या सिनेमातून दाखवण्यात आलेले आहेत. ट्रक ड्रायव्हर म्हटलं की त्याला कुणीही लग्नासाठी मुलगी देत नाहीत, त्याला कुठल्याही पद्धतीचा मान सन्मान मिळत नाही. ट्रक ड्रायव्हर हि सुद्धा माणसंच आहेत ना! त्यांचा ही खूप मोठा वाटा आहे या देशाच्या विकासासाठी. आज ट्रक ड्रायव्हर नसते तर आपल्याला हव्या त्या वस्तू घरबसल्या मिळाल्या असत्या का? सामानाची ने-आण करण्याचं अतिशय जिकिरीचं आणि मेहनतीच काम ट्रक ड्रायव्हर करत असतात. त्यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.
ट्रक ड्रायव्हरच आयुष्य किती कठीण परिस्थितीतून जातं.नवीन ट्रक घेतल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात. चोरीचा आरोप होणं, ट्रक लूटायचे प्रयत्न होणं, अपघात होणं,ट्रक ला आग लावणं अशा रोजच रोडवर ट्रक ड्रायव्हर सोबत घडणाऱ्या घटना…दिग्दर्शक राजु जाधव यांनी अतिशय जिवंत पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. “द ट्रकर एक प्रवास” हा सिनेमा नुकताच OTT Platforms #Hangama #MX Player #Airtel Xtreme #VMovies या सर्व ठिकाणी रिलीज झाला आहे. या चित्रपटातील गाणी व ट्रेलर ही Z Music या युट्यूब चॅनल वर दिसत आहेत.
“द ट्रकर एक प्रवास”या चित्रपटात कलाकार म्हणून यतीन कार्येकर, विजय निकम, प्रणव रावराणे, हेमांगी राव, दिपाली साठे, मयुरेश कोटकर, अनिल रबाडे, छाया डूमरी, प्रणाली चौगुले, सायली धुर्वे, भैरवी कडणे, माधुरी कुंभार, राजू मोरे, संदिप गोलटकर, जितेंद्र आमरे आणि नवीन पदार्पण – रूही तारु आणि सागर वडाळे यांनी कामे केली आहेत.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर