राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट
कल्याण
केडीएमसी हद्दीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामासोबतच नागरी सुविधांकडेही लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली असून याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव व प्रदेश प्रतिनिधी नोवेल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आले. तसेच एक विनंती पुर्वक निवेदन वजा सुचना देऊन कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरिकांच्या हितासाठी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी वकील सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद भिल्लारे, विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, रविंद्र जरांडे, रमेश साळवे, मनोज नायर, सुरय्या पटेल, रंजना शर्मा, अशोक काळपुंड व इतर मान्यवर उपस्थित होते.
एका बाजूला कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी चे काम जोरात सुरू आहे, हे भविष्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, परंतु सध्या त्याच बरोबर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने नागरी सुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिक जिवंत राहिले तरच ते स्मार्ट सिटी बघतील अन्यथा स्मार्ट सिटी चा काय उपयोग असा सवाल नोवेल साळवे यांनी व्यक्त केला आहे. पुर्वी जिथे जिथे मोफत सार्वजनिक मुतारी व शौचालय होत्या. त्या काही कारणांमुळे ते तोडण्यात आल्या. त्यांची पुनबांधणी त्याच ठिकाणी करण्यात यावी. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर ही लक्ष देऊन रुक्मिणी बाई रुग्णालयात व शास्त्री नगर रुग्णालयात नागरिकांना उत्तम व मोफत आरोग्य सुविधा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर