December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Kdmc: सफाई कामगारांना नियुक्ती पत्र प्रदान

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते नुकतीच वारसाहक्काने १२ कर्मचा-यांना सफाई कामगार या पदावर नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

महापालिका सेवेत रुजू झाल्यामुळे या सफाई कर्मचा-यांच्या चेहे-यावरील आनंद व्दिगुणीत झालेला दिसून आला. या सफाई कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे व मनोभावे महापालिकेची सेवा करुन कल्याण डोंबिवली नगरीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सहकार्य करावे असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी नियुक्ती पत्र प्रदान करते वेळी काढले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त अर्चना दिवे, उपआयुक्त धैर्यशील जाधव उपस्थित होते.