December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

वॉटरफॉल रॅपलिंगचा यशस्वी प्रयोग

कल्याण

पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेड लागते ते नैसर्गिक धबधबे, गडकोटांकडे वाट फिरवण्याचे. त्यातच निसर्गाच्या सौंदर्याचं चित्र न्याहाळत असतांना सोबतीला जर साहसी खेळ असेल तर त्याची मज्जा द्विगुणितचं होते. असाच एक प्रयोग नावाजलेल्या कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी ट्रेक आयोजित करणाऱ्या संघाने करून दाखवला. कल्याणच्या कुशिवली गावालगतं असलेल्या सुमारे ८०० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या ताहुली धबधब्यावर वॉटर फॉल रॅपलिंगचा प्रयोग प्रथम प्रयत्नातचं यशस्वी करून दाखवला. कल्याणकरांनी ताहुली कड्याच्या इतिहासात प्रथमच वॉटर फॉल रॅपलिंग प्रयोग यशस्वी करून दाखविल्याने शहराच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला.

कुशिवली गावातून ट्रेकला सुरुवात होताच सुमारे २ तासांची खडी आणि अतिकठीण चढाई केल्या नंतर ताहुली कड्यावर पोहचल्या नंतर सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने आधी रॅपलिंगचा सेटअप लावला. त्यानंतर खरा थरार अनुभवत संघातील लिडर्स ने एक एक करून खाली उतरून आलेल्या पार्टीसिपेट लोकांना विश्वास दिला.

ह्या मोहिमेत दर्शन देशमुख, पवन घुगे, रणजित भोसले, भूषण पवार, सुनील खणसे, लतीकेश कदम, विकी बुरकुल, कल्पेश बनोटे, अक्षय जमदरे, रसिका येवले, राजेश गायकर, नितेश पाटील, सागर डोहळे, स्वप्नील भोईर, प्रदीप घरत, महेंद्र भांडे आणि योगेश शेळखे आदीजण सहभागी झाले होते. या आधी ही सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने अतिकठीण सुळखे, कडे आणि गड सर करून गडकोटांच्या प्रति प्रेम निर्माण करायला तरूणाईला प्रेरित केले आहे.

तंत्रशुद्ध सेटअप पध्दत आणि ब्रँडेड गिर्यारोहण साहित्य असल्याने अश्या अवघड मोहीम अगदी सहजपणे यशस्वी करता येतात. पण अश्या साहसी मोहीम आखतांना सह्याद्री च्या कड्यांचा मान ठेऊन अतिजोखिम आणि निष्काळजी पणा तरुणांनी टाळला पाहिजे असे आवाहन पवन घुगे यांनी केले आहे.