कल्याण
नवी मुंबई आतंतराष्ट्री विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव नुकताच नव्या शिंदे सरकारने पारित केला. विमानतळाला नाव लागावे यासाठी भुमीपुत्रांनी मागच्या दोन वर्षभर कंबर कसली होती. सर्वपक्षीय कृतीसमीतीच्या माध्यमातून जरी हा लढा उभारला होता तरी भुमीपुत्रांच्या अनेक लहान-मोठ्यासंस्थांनी या लढ्याला यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते. यापैकीच सर्व पक्षीय कृती समितीशी संलग्न असेलेली पाचही वेगवेगळ्या तालुक्यातील पाच तरुणांनी बांधलेली ‘पंचमहाभूत संघटना’. दिबांचा योध्दा म्हणुन पंचमहाभूत संघटनेचा सत्कार एकविरा कला संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
चारही सागरी जिल्ह्यातील युवकांपासून ते जेष्ठांपर्यंत दिबांचे विचार आणि चळवळ पोहचविण्यात पंचमहाभूत संघटनेचा सिंहाचा वाटा होता. या संघटनेट वसईचे भुमीपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील, पालघरचे मर्चंट नेव्ही ऑफिसर गणेश पाटील, भिवंडीचे युवा साहित्यिक सर्वेश तरे, रायगडचे आगरी-कोळी-कराडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ आणि भाईंदर येथील ॲड.सुशांत पाटील यांचा समावेश आहे. या पाच तरुणांनी वसई-पालघर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-ठाणे, नवी मुंबई-मुंबईत प्रत्यक्ष ठिकाणी दिबांची चळवळ पोहचवली. परिणामी २४ जुनच्या आंदोलनाआधी त्यांना नोटीसा देखील आल्या त्याला न जुमानता पंचमहाभूत संघटना निडर पणे २४ जुनच्या अभुतपुर्व आंदोलनात सहभागी झाली अन लढा यश्वस्वी केला. यासाठी एकविरा कलासंस्था यांच्या वतीने या पाचही तरुणांना म्हणजे पंचमहाभूतांना ‘दिबांचा योध्दा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल मनपाचे मा.उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी देखील पंचमहाभूतांच्या कार्याचे कौतुक केले. सोबतच पंचमहाभूतांच्या लेखणीने अनेक नवतरुणांमध्ये जोश निर्माण झाला असा विशेष उल्लेख जगदिश गायकवाड यांनी केला. हा पुरस्कार आम्ही आमचे स्वागत म्हणुन स्विकारतो परंतू हा पुरस्कार खरं तर केंद्रातुन ज्या दिवशी प्रस्ताव मंजूर होईल तेव्हा खरा सन्मान म्हणून आम्ही स्विकारु तोवर लढत राहू असे पंचमहाभूत सुशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर