December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भारतातील नामवंत व्यक्ती व आई-वडिलांना पाठविले पत्र

सम्राट अशोक विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

कल्याण

पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शुभेच्छा दिल्या.

शाळेतील विद्यार्थ्यांना पत्र लेखन अभ्यासक्रम आहे. परंतु मोबाईलच्या वापरामुळे प्रत्यक्षात पत्र लेखन दुर्मिळ झाले आहे मोबाईल व टी.व्ही. मुळे मुलांशी संवाद साधायला पालकांना वेळ नाही. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या कल्पनेतून सुमारे सातशे विद्यार्थ्यांच्या सहभागाने पालकांना पत्र लिहून आम्हाला वेळ द्या. आमच्याशी गप्पागोष्टी करा. असा मजकूर पत्रात लिहून पालकांना पत्र पाठविले. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह भारतात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती ज्यांचे भारताला बहुमूल्य योगदान लाभले आहे. अशा थोर व्यक्तींना व सीमेवरील जवानांना पोस्ट कार्ड च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने सात हजार पेक्षा अधिक पोस्टकार्ड संस्थेचे अध्यक्ष पी. टी.धनविजय, माध्यमिक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे, अनिल शिर्के, पंकज दुबे, संतोष कदम व उमा पदमवार यांच्या उपस्थितीत कल्याण शहर मुख्य पोस्ट मास्तर अशोक सोनवणे, पोस्ट कर्मचारी सुधाकर देव्हारे, योगेश हरड यांच्याकडे शाळेचे वर्ग प्रतिनिधी विद्यार्थ्यांमार्फत पोस्टकार्ड सुपूर्त करण्यात आले. इंग्रजी मराठी माध्यमाच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे पत्रलेखन कार्यक्रम यशस्वी झाला.