December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Kdmc आयुक्तांच्या हस्ते ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

कल्याण

घरोघरी तिरंगा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी होऊन 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. महापालिका मुख्यालयातील ध्वज विक्री केंद्राचा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यावेळी बोलतांना त्यांनी हे आवाहन केले.

शासनाच्या निर्देशान्वये “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम महापालिका राबवित असल्याने या उपक्रमात नागरिक सहभागी होत असून या उपक्रमास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे अशीही माहिती महापालिका आयुक्त डॉ.दांगडे यांनी दिली. यावेळी उपआयुक्त सुधाकर जगताप, परिमंडळ 1 चे उपआयुक्त धैर्यशील जाधव, महापालिका सचिव संजय जाधव, उपआयुक्त अर्चना दिवे, वंदना गुळवे, पल्लवी भागवत, अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेकडे आता 2 लाख ध्वज प्राप्‍त झाले असून आज सुमारे 1 लाख ध्वज उपलब्ध होणार आहेत हे ध्वज केवळ ९ रुपये येवढया अल्प किंमतीत महापालिकेकडून उपलब्ध होणार आहेत. महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात तसेच सर्व प्रभागांमध्ये ध्वज विक्रीसाठी उपलब्ध राहणार असून त्या विक्री केंद्रातून नागरिकांना ध्वज विकत घेता येतील. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील स्वस्त धान्यांच्या दुकानात आणि महापालिका कर्मचा-यांमार्फत तसेच बीएलओमार्फत घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वितरण आणि विक्री केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.दांगडे यांनी दिली. तसेच 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हे राष्ट्रध्वज कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात डौलाने फडकतील असा विश्वास व्यक्त करत आयुक्तांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.