कल्याण विकास फाउंडेशन व माजी आमदार नरेंद्र पवार आयोजित तिरंगा दिंडी
कल्याण
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी कल्याण, विकास फाउंडेशन व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य पायी तिरंगा दिंडीत शेकडो नागरिक, व्यापारी, अनेक शाळांमधील शिक्षक व शहरातील मान्यवर उपस्थित होते.
आज सकाळी कल्याणमधील दुर्गाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तिरंगा दिंडी ला सुरुवात झाली. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीला सुरुवात केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा पवार, भाजपा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, माजी नगरसेवक दया गायकवाड, संजय कारभारी, महिला आघाडी अध्यक्षा ज्योती भोईर, महिला आघाडी प्रदेश सचिव प्रिया शर्मा, यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांचे टाळ मृधुंग, शहरातील अभिनव विद्यामंदिर, शशांक बालविहार, शारदा विद्यामंदिर शाळांमधील विद्यार्थ्यांची लेझीम, हातात तिरंगा घेऊन देशभक्ती पर घोषणा देणारे महिला व नागरिकांसोबत रस्त्याच्या दुतर्फा व इमारतीच्या गच्ची आणि बाल्कनीतुन शहरातील नागरिक प्रतिसाद देत सहभागी होत होते. दुर्गाडी चौकातून पुढे लालचौकी, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, आग्रा रोड, टिळक चौकात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पारनाका येथे स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला वंदन, गांधी चौकात महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून सुभाष मैदानात या तिरंगा दिंडीचा समारोप करण्यात आला.
समारोप प्रसंगी कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेले क्रांतिवीर, देशभक्त यांना स्मरण करून हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांसाठी १५ हजार तिरंग्याचे वाटप करण्यात आले असून अजून पाच हजार तिरंग्याचे वाटप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यामार्फत करणार येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर