कल्याण
‘ड्रायव्हर डे’चे औचित्य साधत इंडियन ऑईल आणि डी. एच. एल यांच्या सहकार्याने आणि हमसफर ड्राईव्ह सेफ्टी फाउंडेशन, अपलिफ्ट म्युचल, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, सक्षम फाउंडेशन, महा लॅब या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वडपे येथे करण्यात आले होते.
यावेळी इंडियन ऑईल मार्केटिंगचे राहुल दास यांनी ड्रायव्हर डे आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून ड्रायव्हर्स सोबत साजरे करतो हे सांगितले आणि उपस्थित सर्व ड्रायव्हर्सचे अभिनंदन केले. तसेच हमसफर संस्थेचे व्यवस्थापक शरद ठाकरे यांनी ड्रायव्हर्सना ड्राईव्ह सेफ्टी याविषयी मार्गदर्शन केले. ड्रायव्हर सेफ्टी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सेफ्टी नियमांच पालन करून वाहन चालवण्यासाठी प्रोत्साहित केले.
आरोग्य तपासणी बरोबर कोणत्याही प्रकारचे रोड अपघात कमी करणे व ड्रायव्हर्स राहणीमानात विचारांमध्ये बदल व्हावेत हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. तसेच अपलिफ्ट म्युचलचे संजोग जाधव यांनी सर्व ड्रायव्हर्सना स्वास्थ संबंधी सेवाविषयी माहिती सांगितली. महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टचे व्यवस्थापक सतिश ठाकूर यांनी ड्रायव्हर्सचे गुप्तरोग याविषयी माहिती देवून सहभागी सर्व ड्रायव्हर्स, वर्कर्स याच्या मोफत तपासण्या करून घेतल्या.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर