कल्याण
पत्रकारांसाठी काम करणाऱ्या प्रेस क्लब कल्याणच्या अध्यक्षपदी विष्णुकुमार चौधरी यांची निवड झाली आहे. समाज हितासाठी समाज प्रबोधन करण्याचे काम पत्रकार करत असतात. कोरोना प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देखील कार्यरत राहून पत्रकारांनी कार्य केले आहे व करत असतात.
अशाच प्रकारे गेल्या २२ वर्षांपासून पत्रकारांसाठी काम करणाऱ्या प्रेस क्लब कल्याणच्या अध्यक्षपदी सन २०२३-२४ साठी दैनिक गुजरात समाचारचे पत्रकार विष्णुकुमार चौधरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवड झाली आहे. प्रेस क्लबच्या २०२३-२४ च्या कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी विष्णुकुमार चौधरी, उपाध्यक्षपदी कुणाल म्हात्रे, सचिवपदी अतुल फडके, खजिनदारपदी सचिन सागरे, सदस्यपदी माधव डोळे, एस.एन. दुबे, अशोक वर्मा, प्रवीण आमरे, रमेश दुधाळकर, दत्ता बाठे, रवी चौधरी, सल्लागारपदी नवीन भानुशाली, दिपक जोशी, आनंद मोरे, सुचिता करमरकर यांची निवड करण्यात आली आहे.
प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष आनंद मोरे यांनी नवीन कार्यकारणीचे स्वागत करत शुभेच्छा देत आपला पदभार विष्णुकुमार चौधरी यांच्याकडे सोपविला.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर