December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

प्रतीकात्मक फोटो

Dombivali : खदाणीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

चार जणांना वाचवण्यात यश

डोंबिवली

भोपर भागातील खदाणीत दोन  मुलं बुडाल्याची घटना समोर आली आहे. आयुष केदारे (१३ वर्ष) तर दुसऱ्या मुलाचं नाव आयुष असून तो १४ वर्षाचा होता.

आज दुपारच्या सुमारास आयरे गावातील सहा लहान मुलं या खदानीत पोहण्यासाठी आले होते. मात्र त्यांना खदानीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आरडा ओरड झाल्याने काही ग्रामस्थांचं या मुलांकडे लक्ष गेल्याने त्यांनी खदानीच्या दिशेने धाव घेतली याबाबत तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली ग्रामस्थ व अग्निशमन विभागाच्या मदतीने सहामधील चार जणांना वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश आलं. मात्र, यामधील दोन मुलं बुडाली. तासाभराच्या प्रयत्नानंतर या दोघांचाही मृतदेह सापडला.

दरम्यान, या खदानीमध्ये पोहण्यास मनाई आहे. मात्र, अनेकदा लहान मुलं, तरुण या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात त्यामुळे आता या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.