कल्याण
गुजरात येथे वर्ल्ड गोजू-रू कराटे डो, च्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया या संस्थेमार्फत कल्याणच्या खेळाडूंनी कुमिते आणि काता या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करत 21 पदकांची लयलूट केली.
वलसाड गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यस्थान, मध्य प्रदेश, वेस्ट बंगाल व अन्य राज्यांतून उत्तोत्मतम खेळाडू सहभागी झाले होते. सर्व विजेत्या खेळाडूंना सेंसाई महेश चिखलकर यांचे प्रशिक्षण लाभले व शिहान भाईदास देसले यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थांचे कल्याण क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.
कुमिते प्रकारात सुवर्ण पदक विजेते – अर्चित पाटील.
रजत पदक विजेते – नैतिक राऊत, गौरवी तारी, उजाला यादव.
कांस्य पदक विजेते – ओम कांबळे, प्रांजल कुतरवाडे, मंजिरी कुतरवाडे, आशिष सहेजराव, सुमेध गायकवाड.
काता प्रकारात सुवर्ण पदक विजेते – ओम कांबळे, अर्चित पाटील, प्रांजल कुतरवाडे, गौरवी तारी.
रजत पदक विजेते – सिध्दी काकड, सुमेध गायकवाड.
कांस्य पदक विजेते – नैतिक राऊत, मंजिरी कुतरवाडे, उजाला यादव, चेतना साळुंके, आशिष सहेजराव.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू