उल्हासनगर
मुंबई विद्यापीठ, ठाणे विभाग आणि केबीपी महाविद्यालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालयातील महिला खेळाडूंनी द्वितीय स्थान पटकावले आणि 5 खेळाडूंनी विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
त्यात अनुक्रमे मनोरमा शर्मा, रेश्मा राठोड, अश्विनी मोरे, वृतिका सोनवणे आणि किशोरी मोकाशी यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत 15 महाविद्यालयातील 150 च्यावर खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. आंतर विभागीय स्पर्धा डॉ. आंबेडकर महाविद्यालय वडाळा येथे होणार आहेत.
एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.पुरस्वानी, आयक्यूएसी को ओर्डीनेटर डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य प्रा. जीवन विचारे, उपप्राचार्य प्रा. दीपक गवादे, प्रा. तुषार वाकसे तसेच क्रीड़ा संचालक राहुल अकुल, पुष्कर पवार, मार्गदर्शक नरेंद्र मेंगल आणि प्रताप शेलार यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी या सर्वांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर