कल्याण
देशाच्या संरक्षणासाठी अनेक मिसाईल बनविणारे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न व अनेक पुरस्कारांनी सन्मानीत डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व मी कल्याणकर सामाजिक संस्थेतर्फे कल्याण पूर्वेतील कॉमन मॅन चौक, गणेशवाडी येथे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी देशाच्या संरक्षणासाठी स्वतः बनवलेली “अग्नी 3” या मिसाईलचा देखावा साकारण्यात आला. सदर देखावा संस्थेचे योगेश बारसकर, दर्शन बिऱ्हाडे, कांता लहाने, प्रशांत मोरे, दिलीप पाटील, सोनू देवळेकर, सोमनाथ यांनी दिवसरात्र मेहनत करून बनविला असल्याची माहिती मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी दिली.
आणखी बातम्या
लोकधारा परिसरात अखंड रामायण पाठ
पिंपळवृक्षाची अंधश्रद्धेतून सुटका
यु टाईप रस्ता रुंदीकरणासाठी सह्यांची मोहीम