कल्याण
पूर्वेतील चक्कीनाका तसेच गायत्री विद्यालय या दोन्ही ठिकाणी खूप कचरा पडत असे. हि बाब लक्षात घेऊन सहयोग सामाजिक संस्था व सुप्रिया डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्यावतीने या कचराकुंडीचे रूपांतर सुंदर अशा शिल्पामध्ये करण्यात आले असून दोन्ही परिसर कचरा मुक्त करण्यात आला.
केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महापालिका शहर सौदर्यकरण या अभियानाद्वारे सामाजिक संस्था, विकासक, कंपन्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून त्याद्वारे चौक, बगीचा, डिव्हाडर, शिल्प उभे करणे असे विविध कार्यक्रम केडीएमसीने हाती घेतले आहेत. या अभियानाद्वारे सहयोग सामाजिक संस्थेने दोन ठिकाणी शिल्प उभारून शहर सौंदर्यकरणात भर घातली आहे. माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी देखील महापालिकेने घंटा गाडीचे योग्य नियोजन केले पाहिजे, व प्रत्येक प्रभागामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करणे याची जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सहयोग संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी सांगितले की, आमच्या संस्थेने कल्याण पूर्वेत सहा ठिकाणी कचरा कुंडीचे शिल्पात रूपांतर केले आहे. पाच ठिकाणी बॅनर लावून झाडाच्या कुंड्या ठेऊन हे परिसर कचराकुंडी मुक्त केले आहे.
या कार्यक्रमात जे वॉर्ड सहायक आयुक्त सविता हिले, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, रोटरीचे सेक्रेटरी सुनील डाळिंबे, संदीप तांबे, संदीप माने, एसईओ सुरेश काळे, अभिजित बने, भारत सटाळे, संतोष अवचार आदी उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर