कल्याण
विनोद म्हणजे विनोदी साहित्याच्या बागेतील फुलं, पानं, एकत्रित करून केलेला एक सुंदर गुच्छ असे उद्दगार सार्वजनिक वाचनालय कल्याण पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत आयोजित हास्य संजीवनी या कार्यक्रमाच्या वेळी दिपाली केळकर यांनी काढले.
जसे तुरटीमुळे पाणी स्वच्छ होते आणि गाळ खाली बसतो. तसे विनोदामुळे आयुष्यातील गाळ खाली बसतो आणि आयुष्य स्वच्छ आणि सुंदर होत असे त्या म्हणाल्या. त्यांनी कार्यक्रमात पु. भा. भावे, वि. आ. बुवा, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे तसेच अनेक साहित्यिकांचे किस्से सादर केले. या कार्यक्रमाप्रसंगी आशा जोशी, सीमा गोखले तसेच ग्रंथपाल गौरी देवळे उपस्थित होते. हास्य रसिकांच्या उत्साहात वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती भिकू बारस्कर यांनी दिली.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी