December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अभिनेत्री मीरा जोशी

World Record : अभिनेत्री मीरा जोशीने रचला विश्वविक्रम

जगातील सर्वात उंचावरील गुरुद्वारासमोर केले नृत्य

आजूबाजूला बर्फाच्छादित डोंगर, उणे ३ अंश सेल्सिअस तापमान, ऑक्सिजनची खालावलेली पातळी अशी खडतर आव्हाने पार करत नृत्यांगना आणि अभिनेत्री असलेल्या मीरा जोशीने १२ तासांत हा ट्रेक पूर्ण करीत जगातील सर्वात उंचीवरील गुरुद्वारासमोर नृत्य सादर करणारी पहिली अभिनेत्री ठरली.

उत्तराखंड येथील पर्वतरांगांच्या कुशीत शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंद सिंग यांचे तपश्चर्या स्थान आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे श्री हेमकुंड साहिब गुरूद्वारा बांधण्यात आला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे ४६३२ मीटर इतकी आहे. पुलना येथून जवळपास २० किमीच्या उभ्या चढाईनंतर हेमकुंड साहिब येथे पोहोचता येते. तिथे मीराने एक ओंकार सतनाम या मंत्रावर नृत्य सादरीकरण केले.  अभिनेत्री मीरा जोशी ही उत्तम नृत्यांगणादेखील आहे. नुकताच तिने जगातील सर्वात उंचीवरील उत्तराखंडमधील श्री हेमकुंड साहिब गुरूद्वारासमोर नृत्य सादरीकरण करून विश्वविक्रम रचला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षीदेखील मीराने जगातील सर्वात उंचीवरील महादेवाच्या मंदिरासमोर नृत्य सादर करत विश्वविक्रम केला होता.

कमी दाब, थंड हवामान आणि सूर्याची किरणे. या सर्वांमुळे माझ्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश आणि टॅनिंग झाले. जे बरे होण्यासाठी सुमारे १५ दिवस लागले. माझा ट्रेक मेट तुषार सुभेदार याने संपूर्ण ट्रेकमध्ये माझ्या व्हिडिओ रेकॉर्डिंगपासून ते मला चढण्यास आणि उतरण्यास मदत केली. भारतातील रेकॉर्ड आणि हाय रेंज बुक ऑफ वर्ल्डची फॉरमॅटिलीज पूर्ण करण्यात मला मदत केल्याबद्दल मी माझे ट्रेक लीडर वरुण कवन आणि आनंद बनसोडे यांचे आभार मानू इच्छिते.

— अभिनेत्री मीरा जोशी