April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी

Kalyan : संविधान गुणगौरव प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन

कल्याण

२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण पूर्वच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संविधान गुणगौरव प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कल्याण पूर्वेतील मॉडेल महाविद्यालय आणि साकेत महाविद्यालय या ठिकाणी हि स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दोन्ही महाविद्यालयातील २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे आयोजन मनसेचे सतिश उगले, अंकुश राजपूत, प्रणव देसाई यांनी केले होते.

या स्पर्धेसाठी म.न.टे.से. सरचिटणीस निर्मल निगडे, शहर संघटक स्वप्नील पंडित, विभाग अध्यक्ष विनीत भोई, शाखा अध्यक्ष विनायक पाटील, महाराष्ट्र सैनिक अतिन रोकडे, कैलास आडोळे, रोहित व्हावळ, प्रथमेश जाधव, ज्ञानेश्वर झोपे यांचे विशेष सहकार्य लाभले. घेतलेल्या या स्पर्धेत साकेत महाविद्यालयातून अंजली वर्मा प्रथम, वैष्णवी शर्मा द्वितीय, मोनिका म्हाञे तृतीय तर प्रणिता शिंदे आणि प्रतिक्षा गायकवाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तर मॉडेल महाविद्यालयातून प्रेरणा बैत प्रथम, किर्ती प्रजापती द्वितीय, मुद्रा चव्हाण तृतीय, किमिशा झंजे आणि वैष्णवी नौबत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना संविधानाच्या उद्देशिकाची फ्रेम, प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.