कल्याण
पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातर्फे भारतीय संविधानाच्या प्रतीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. देशाच्या संविधानाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने मिरवणूक काढली नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत संविधानाच्या प्रतिमेचे पूजन केले.
संविधान हेच खरे नागरिकांसाठी दैवत आहे घराघरात संविधान वाचन होणे महत्त्वाचे आहे आदर्श नागरिक होण्याकरिता विद्यार्थ्यांपर्यंत संविधानातील कलम पोहोचले पाहिजेत. असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले. घटनेने न्याय हक्क दिला आहे त्याप्रमाणे नागरिकांनी वागले पाहिजे. संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय म्हणाले मिरवणुकीत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह