मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यात ए. व्ही. स्पोर्ट्सचे योगदान महत्वाचे – पवार
कल्याण
अलीकडच्या धावपळीच्या व मोबाईलच्या युगात मैदानी खेळांची जागा इंटरनेटने घेतली आहे. येणाऱ्या काळात हे खेळ लोप पावतील की काय अशी भीती असताना कबड्डी स्पर्धा भरवून स्तुत्य उपक्रम राबविला आहे. मैदानी खेळ जिवंत ठेवले पाहिजेत, बौद्धिक व शारीरिक विकास हा मैदानी खेळांवर अवलंबून असतो. कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून चपळता वाढते. गेल्या 4 दशकात या संघाने अनेक नामवंत कबड्डीपटू घडवले आहेत, राज्यस्तरावर स्पर्धेच्या माध्यमातून झेप घेतली आहे. मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यात ए. व्ही. स्पोर्ट्सचे योगदान महत्वाचे असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.
ए. व्ही. स्पोर्ट्स अटाळी वडवलीच्या वतीने व ठाणे जिल्हा कबड्डी असो. मान्यतेने सुवर्ण महोत्सवनिमित्त कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली.
यावेळी एव्ही स्पोर्ट्सचे संस्थापक जनार्दन पाटिल, सुरेश भोईर, ह.भ.प अंबादास महाराज, प्रकाश पाटील, बळीराम भोईर, जनार्दन पाटील, प्रताप भोईर, गजानन पाटिल तसेच नवनाथ पाटील, शशिकांत पाटील, वार्ड अध्यक्ष राजन पाटील, अनंता पाटील, संतोष शिंघोळे, हेमंत गायकवाड, अनंता पाटील गालेगाव, विनायक भगत आदी पदाधिकारी, मंडळाचे सदस्य व मोठ्या संख्येने कबड्डी प्रेमी उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर