December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Sports : बैशालीची शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड

वासिंद

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत न्यू आयडियल स्कुल, वसिंद येथे इयत्ता नववीमध्ये शिकणारी  बैशाली मोंडल हिने अंतिम सामन्यात ७० किलो वजनी गटात निर्णायक विजय मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच आर्या तारमले हिने रजत पदकाची कमाई करत शाळेचे नाव उंचावले असून बैशालीची शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड करण्यात आली असून ही स्पर्धा खोपोली येथे १७ व १८ जानेवारीला होणार आहे.

दिनांक १५ डिसेंबरला खोपोली येथे रायगड जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ठाणे जिल्हा ग्रामीण भागातून न्यू आयडियल स्कुल आणि ज्यू कॉलेज वसिंद शाळेची नववीत शिकणारी बैशालीने निर्णायक विजय मिळवत आपल्या शाळेचे नाव उंचावत शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत धडक मारली आहे.

बैशाली हि ग्रामीण भागात जिल्ह्यातून प्रथम येणारी कन्या असून तिला शाळेचे मुख्याध्यापक अरुण भोईर, उप मुख्याध्यापक नीलम जाधव, क्रीडा शिक्षक मारुती दळवी, संदीप नरवाडे यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तिचा गौरव केला.