December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Modak Maharaj : नवनितानंद महाराज यांचे अपघाती निधन

कल्याण

पश्चिमेतील फाँरेस्ट काँलनीत उभारलेल्या स्वामी समर्थ मठाचे संस्थापक आणि महाराष्ट्रात १७ मठ साकारून स्वामी समर्थ सेवेचा आंगिकार हजारो भक्तांना देत स्वामी शिष्याचा परिवार वृद्धिंगत करणारे मोडक महाराज ऊर्फ नवनितानंद महाराज यांच्या सातारा येथील अपघाती निधानाने अध्यात्मिक क्षेत्रातील अवतार कार्याची प्रचंड हानी झाली आहे. त्यांच्या निधनाची वर्ता समजाताच हजारो शिष्यमंडळीमध्ये हळहळ व्यक्त होत संपूर्ण शिष्य परिवारासह समाजातील सर्वच स्तरातील वर्ग शोकसागरात लोटला गेला.

पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाची स्थापना मोडक महाराजांनी केली. गेल्या काही वर्षापासून स्वामी नामाचा प्रचार कल्याणपासून सुरु होत डोंबिवली, ठाणे, आलिबाग, मुरुड-जंजिरा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा व संपूर्ण कोकणभूमीत १७ नवीन मठांच्या रूपाने विस्तारत आहे. हा स्वामी परिवार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. मोडक महाराजाचे औलिक सामर्थ्य असलेले अवतार कार्याचा पर्व लोप पावल्याने अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याने जनसमुदाय शोक सागरात बुडल्याचे दिसत होते.