अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचा पुढाकार
कल्याण
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्याच्या डॉक्टर होणाऱ्या मुलीसाठी 50 हजारांची मदत करण्यात आली आहे. कल्याण येथे गेले अनेक वर्षा पासून विलास कांगणे हे आग्रा रोड येथे वृतपत्र विक्रीचा व्यवसाय करुन आपला उदर निर्वाह करीत आहेत. कांगणे यांच्या वृतपत्र विक्रिवर मिळणाऱ्या महीना आठरा हजार रुपये मिळकतीवर कसा बसा संसाराचा गाड़ा चालू आहे.
कांगणे यांच्यावर लक्ष्मीची कृपा फारशी नसली तरी सरस्वतीची कृपा मात्र झाली आहे. याचमुळे आज त्यांची मुले मेरिटमध्ये येऊन उच्च शिक्षण घेत आहेत. विलास कांगणे यांची मुलगी अनघा हिचा मेडिकल कॉलेजला एमबीबीएस करीता मेरिट मध्ये नंबर लागला आहे. वर्षाचा खर्च साडेचार लाख रुपये आहे. हा ख़र्च भागविण्यासाठी तिच्या पालकांनी बँकेतून शैक्षणिक कर्जासाठी प्रयत्न केला परंतु कोरोना काळात वृत्तपत्र विक्रिचा व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने त्यांना यापूर्वी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरता न आल्याने बँकेने त्यांना नव्याने कर्ज देण्यास नकार दिला.
त्यामुळे मुलीच्या फि चा प्रश्न उभा राहिला ज्यामुळे तिला परीक्षेला बसता येणार नव्हते. मुलीचे वर्ष वाया जाते की काय अशी भीति वडिलांना वाटू लागली. आता काय करायचे या चिंतेत असताना त्यांनी वृत्तपत्राच्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुलीच्या फि ची अड़चण सांगितली. त्यावर समितिने तातडीने निर्णय घेऊन तात्काळ पन्नास हजार रुपये रोख देण्याचे कबुल केले. आणि दोनच दिवसात समितीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांच्या पुढाकाराने सदर रक्कम उभी करून वंजारी भवन येथे अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांच्या हस्ते ५०हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी सरचिटणीस अर्जुन डोमाडे, खजिनदार रामनाथ दौंड, उपाध्यक्ष आत्माराम फड, अर्जुन उगलमुगले, सुनील आंधळे, सतीश दराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
धनादेश मिळण्याने मुलीच्या शिक्षणात आलेला अडथळा दुर होत असल्याचा आनंद मुलीच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सर्वानी अनघा हिस पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या आणि वृत्तपत्र विक्रीसारखा छोटासा व्यवसाय असतानाही मुलांच्या उज्वल भविष्यासाठी धडपड करणाऱ्या आई-वडिलांचे कौतुक करुन अभिनदंन करण्यात आले. मुलांच्या उच्च शिक्षणसाठी अशाच प्रकारे गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना मदत करता यावी म्हणून समितीच्या वतीने कायमस्वरूपी शिक्षण फंड उभारण्याची संकल्पना कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांनी यावेळी मांडली त्यास सर्वांनी अनुमोदन दिले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह