म्हैसकर स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या तरणतलावात रंगणार स्पर्धा
डोंबिवली
खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या डोंबिवली जिमखाना, म्हैसकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने जिल्हास्तरीय अॅक्वाटिक चॅम्पीयनशीप स्विमिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी रोजी दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेचे हे २४ वे वर्ष असून यंदा आजूबाजूच्या शहरातील १५ ते २० क्लबचे जवळपास तीनशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
जिमखान्याच्या तरण तलावात खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर या खेळाडूचा हुरूप वाढवत त्यांना स्पर्धांची सवय लागावी यासाठी जिमखाना स्तरावर स्पर्धांचे आयोजन देखील केले जाते. मागील २३ वर्षापासून जिमखान्याच्या तरणतलावात जिल्हास्तरीय ॲक्वाटिक चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले जाते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे या स्पर्धामध्ये खंड पडला असला तरी यंदा पुन्हा एकदा जिमखाना या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
२६ फेब्रुवारीला होणाऱ्या या स्पर्धेत कळवा, ठाणे, नवी मुंबई, शहाड, कोकण भुवन, डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण, वासिंद, एडन वूड्स, हिरानंदानी या सारख्या १५ ते २० क्लबमधून ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. सकाळी ९ वाजता सुरु होणाऱ्या या स्पर्धा दिवसभर चालतील. या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रेक्षकाच्या बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. स्पर्धा संपल्यानंतर या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवराच्या हस्ते रोख रक्कम, मानचिन्हाने सन्मानित केले जाणार आहे.
या स्पर्धेत जे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडतील त्या खेळाडूंना विशेष कौतुक करून मान्यवराच्या हस्ते रोख रक्कम दिली जाणार आहे.
दिलीप भोईर अध्यक्ष, डोंबिवली जिमखाना.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह