२५ वर्षांनंतर झाली मित्र-मैत्रिणींची अनोखी भेट;
आठवणींना दिला उजाळा
कल्याण
‘अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवूनी जाती’या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा २५ वर्षांनी एकत्रित येत मोहिंदर सिंग काबल सिंग महाविद्यालयाच्या १९९६च्या बॅचने रविवारी पश्चिमेतील वायले नगर परिसरातील साई हॉल येथे स्नेहमेळावा आयोजित केला होता.
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या निमित्ताने व सर्व स्नेही जणांना एकत्र भेटण्याच्या उद्देशाने सोबतच गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भरलेला हा मेळावा म्हणजे, नवीन उर्जा, नवीन उत्साह निर्माण करणारी शिदोरीच होता.
या स्नेहमेळाव्याला ज्यांच्या संस्कारातून आपण घडलो. त्या वंदनीय गुरुजनांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी, महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी, सर्व गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी मनापासून मेहनत घेतली. श्रुती घोसाळकर, मिथुन चंदने, विद्या पानसरे, दिपाली गोथड, वैशाली शिंदे, कुलदीप पाटील, अविनाश मेश्राम, यशवंत ठाणगे, गणेश सरनोबत, अजय पोळ आदी माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन केले होते. सूत्रसंचालन विद्या पानसरे यांनी, तर प्रास्ताविक मिथुन चंदने, शिक्षकांबद्दलची माहिती प्रशांत महाजन यांनी तर आभार प्रदर्शन ज्योती उरणकर यांनी मानले.
या आनंद सोहळ्यात उपास्थित विद्यार्थी-विद्यार्थिनीनी आपल्या मनोगतातून आपली ओळख देतानाच वर्गातील जुन्या आठवणीना उजाळा दिला. सुमारे २५ वर्षानंतर ईकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या संवादाने संबंध अधिकच दृढ झाली. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतार यांचे अनुभव कथन करीत सर्वांचीच माने मोकळी झाली. व पुढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याचा भास झाला. यावेळी, गुजरात, पुणे, ठाणे आणि मुंबई शहरात आणि स्थानिक परिसरात आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास असलेले मित्र-मैत्रिणी एकत्र आले होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर