December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मुख्य प्रवेशद्वाराजवळील लहान गेट पडला

Kalyan : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच सरोवराचा पडला गेट

करोडो रुपये खर्च करून केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

कल्याण

प्रबोधनकार ठाकरे सरोवराच्या नुतनीकरणाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन काही तास उलटत नाही तोच सरोवराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लहान लोखंडी गेट पडल्याची घटना घडली.

विविध प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे बुधवारी कल्याण शहरात आले होते. यावेळी नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे सरोवराचे देखील लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कल्याणात कार्यक्रमाला आल्याने कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सरोवराच्या नूतनीकरणाच्या लोकार्पणला काही तास उलटत नाही तोच मुख्य प्रवेशद्वाराजवळील लहान गेट मोडून पडला. तर, या लोकार्पणाच्या दोन दिवस आधी येथे ओपनजिमचे साहित्य देखील तुटले होते. १९ कोटी खर्च करून सरोवराच्या नूतनीकरणाचे काम केले होते. मात्र, कोटींचा खर्च करून देखील अशी घटना घडत असेल तर हे या कामाच्या दर्जाबद्दल नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.