December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

निरंकारी संत समागमामध्ये लोटला भक्तांचा सागर

परमात्माच्या प्राप्तीनेच जीवनाला उचित मार्गदर्शन प्राप्त होते : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

नवी मुंबई

‘‘परमात्म्याच्या प्राप्तीनेच जीवनाला उचित मार्गदर्शन प्राप्त होते. जेव्हा आपले परमात्म्याशी मिलन होते, आपण त्याच्या रंगात रंगून जातो आणि क्षणोक्षणी त्याची जाणीव ठेवतो तेव्हा आपल्या मनामधील समस्त नकारात्मक भावना आपोआपच संपून जातात आणि त्या जागी प्रेम हेच जीवनाचे सार बनून जाते.” असे उद्गार निरंकारी सद्गरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी खारघर, नवी मुंबई येथील सेंट्रल पार्कच्या समोरील सिडको मैदानावर आयोजित केलेल्या एक दिवसीय भव्य निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित विशाल जनसमूहाला संबोधित करताना व्यक्त केले.

या संत समागमामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, पुणे आदि क्षेत्रांतून विशाल जनसागर लोटला होता. सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी या दिव्य युगुलाच्या दर्शनाने व अमृतवाणीने भाविक भक्तगण आनंदविभोर झाले होते.

सद्गुरु माताजींनी आपल्या संबोधनामध्ये समजावले, की जेव्हा आपल्याला या परमात्म्याची जाणकारी प्राप्त होते तेव्हा सर्वांभूती याचेच दर्शन घडत राहते आणि मग कोणाबद्दलही मनामध्ये भेदभाव उरत नाही. सर्वांच्या प्रति सद्भाव उत्पन्न होतो आणि परोपकाराची भावना मनामध्ये जागृत होते.

तत्पूर्वी समागम कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक विद्वान वक्त्यांनी आपले विचार, भक्तिगीतं, भजन आणि कवितांच्या माध्यमातून ब्रह्मज्ञानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला ज्याचा समस्त भाविक-भक्तगणांनी भरपूर आनंद प्राप्त केला. समागमामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींनी सहभागी होऊन सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले.

या दिव्य एक दिवसीय निरंकारी संत समागमामध्ये मोहन छाब्रा (मेम्बर इंचार्ज, ब्रँच प्रशासन) तसेच मंडळाचे नवी मुंबईचे संयोजक वसंत गुंडजी यांनी सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांचे त्यांच्या दिव्य दर्शन व आशीर्वादांबद्दल आणि समस्त भाविक भक्तगणांचे त्यांच्या पावन उपस्थितीबद्दल आभार व्यक्त केले तसेच स्थानिक प्रशासनाला त्यांच्या सहर्ष सहयोगाबद्दल धन्यवाद दिले.