December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

नृत्यातून कलागुण सादर करताना मुले

‘अविश्वसनीय भारत अविश्वसनीय लोक’ पुरस्कार

कल्याण

‘अविश्वसनीय भारत, अविश्वसनीय लोक’हि संकल्पना समोर ठेवत समाजातील बांधवांसाठी निस्वार्थपणाने काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सोलेस इंडिया ऑनलाईन, केडीएमसी, मोहन खेडा ग्रीन्स आणि जीजीयुएस ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ‘आयआयआयपी २०२३’या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा भव्य पुरस्कार सोहळा रविवारी पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडला.

कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी म्हणून विपुल रुपावत, डॉ मनजीत सिंग अरोरा, ठाणे बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष मीलन वैद्य, स्वामी धरामदीप महाराज, केडीएमसीचे घनकचरा उपयुक्त अतुल पाटील उपस्थित होते. तर, केडीएमसीचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, कबड्डी खेळाडू गिरीश इरनाक, डॉ. प्रशांत पाटील, मानस दास, साकेत तिवारी, व्यंकट रमण, स्नेहल कांबळे, रत्नेश महाडिक, रुद्र जोशी, मोहित सिरनानी, गणेश इरनाक, सोलेस इंडिया ऑनलाईनच्या डॉ. रुपिंदर कौर उपस्थित होते.

भारत देशाकडे संस्कृतीने परिपूर्ण असलेला देश म्हणून पहिले जाते. आजही भारत देशाने आपली संस्कृती जपून ठेवली असल्याचे पाहायला मिळते. खरं तर, हे फक्त एकच नाही तर अनेक घटक आहेत जे एकत्रितपणे ते वेगळे चमकतात आणि तिची संस्कृती, तिचे समृद्ध आणि अतुलनीय ज्ञान, तत्त्वज्ञान, श्रद्धा, नैतिकता आणि धर्म ! ही सर्व रत्ने भारता शिवाय इतर कुठेही सापडणार नाहीत. भारत देश हा संयुक्त भूमी म्हणून उभा आहे आणि ते त्याच्या अद्भुत लोकांमुळे असे सोलेस इंडिया ऑनलाईनच्या डॉ. रुपिंदर कौर यांनी सांगितले.

तसेच, अशाच काही अद्भुत लोकांबद्दल १४१ कोटी लोकसंख्येसह आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत. आणि जरी आपण एक जलद विकसनशील राष्ट्र आहोत, तरीही अशी काही क्षेत्रे आहेत जी वेगवान विकासाचा सामना करू शकत नाहीत. समाजातील वंचित घटकांसाठी काही प्रभावी कल्याणकारी योजना सरकारने आणल्या असल्या तरी त्या आपल्यासारख्या विशाल देशासाठी पुरेशा नाहीत. आपल्यातील काही महान आत्मे लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची जबाबदारी उचलतात. अशाच काही निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा तसेच नागरिकांचा सन्मान करण्यात आले. जवळपास ५१ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले असे कौर यांनी सांगितले.

सोलेस इंडिया ऑनलाईन हि संस्थेने १९९६ साली आपली सुरवात केली असून आजपर्यंत काम करत आहे. यात स्वच्छ भारत अभियान, आदिवासी पाड्यातील मुलांसाठी विविध कार्य असे विविध कार्य सोलेस इंडिया हि संस्था करत आहे. या संस्थेच्या वर्धापन दिनानिनित्त इतरांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात लहान मुलांनी आपले कलागुण नृत्यातून सदर केले. तसेच आयोजित कार्यक्रमात उपस्थित डॉ मनजित अरोरा यांनी अपघात झाल्यानंतर अपघाती व्यक्तीचे प्राथमिक उपचार कसे करायचे याचे थोडक्यात प्रशिक्षण यावेळी दिले. साकेत ग्रुप तर्फे शिक्षणाचे महत्व सांगण्यात आले. स्वामी धरमदीप महाराज यांनी भारतातील गुरुकुलाचे महत्व सांगितले. तसेच मानस दास यांनी आपले आरोग्य कशा प्रकारे आपण चांगले ठेवू शकतो, शारीरिक व्यामाचे महत्व देखील पटवून दिले.