नागपूर
महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ०२ एप्रिल रोजी नागपूर येथील तायवाडे येथे घेण्यात आली. या सभेत २०२३ ते २०२७ पर्यंत महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या प्रक्रियेकरिता अॅड. सचिन भांगरे हे निवडणूक अधिकारी होते. तसेच सेवानिवूत्त न्या. करुनाशंकर व भारतीय आट्या पाट्या महासंघाचे निरीक्षक म्हणून डॉ. दीपक कविश्वर यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
नवीन कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी डॉ. बबनराव तायवाडे (नागपूर), सचिवपदी डॉ. अमरकांत चकोले (नागपूर), कोषाध्यक्षपदी सतीश ईखार (वर्धा), उपाध्यक्ष डॉ. उल्हास नांदुरकर (यवतमाळ), डॉ. श्रीधर धाकुलकर (अमरावती), जयकुमार सोनखासकर (अकोला), सहसचिव धर्मेंद्र काळे (औरंगाबाद), शरद गव्हार (उस्मानाबाद), संजय पाटील (नाशिक), अमर खराटे (बुलढाणा), तसेच सदस्यपदी ज्ञानेश काळे (सातारा), संजय काळे (ठाणे), आनंद पवार (धुळे), अनिल माकडे (जळगाव), बळवंत निकुंथ (नंदूरबार), श्यामसुंदर देशमुख (भंडारा)
या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन जय कविश्वर यांनी केले. या सभेला डॉ. श्याम चरडे, डॉ. अशोक पाटील, डॉ. संजय चौधरी तसेच, महाराष्ट्रातील संलग्न जिल्ह्याचे प्रतिनिधी हजर होते अशी माहिती महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले यांनी दिली.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न