December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कोविडचे प्रमाण वाढत आहे घाबरु नका – पण काळजी घ्या

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत केडीएमसी कार्यक्षेत्रातील जनतेला सुचित करण्यात येते की, जरी कोविडचे प्रमाण वाढत असले तरी, घाबरू नका पण काळजी घ्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड नियंत्रणात आहे.

तरी कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी.

 

१.  सह-व्याधी असणा-या व्यक्ती आणि वृध्द यांनी गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.

२. डॉक्टर, पॅरामेडिकल आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आरोग्य संस्थामध्ये तसेच रुग्णालयात मास्कचा वापर करावा.

३. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरावा.

४. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल /टिश्यु वापरावा.

५. हाताची स्वच्छता राखवी, वारंवार हात धुवावे.

६. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.

७. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी.

८. श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करावा.

९. कोविड उपचार व निदानाची सोय महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

१०. सर्व व्यक्तींनी कोविड बुस्टर डोस लसीकरण करावे.

११. सौम्य लक्षणे असल्यास स्वतः खात्री करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी.

१२. लक्षणे सौम्य असली तरी कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणुन कार्यालयात, शाळा, महाविद्यालये, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी न जाता पुर्ण बरे होईपर्यंत स्वतः घरी अलगीकरण करावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्यामार्फत करण्यात आले आहे.