उच्चशिक्षित चोरट्यास खडकपाडा पोलिसांनी केली अटक
कल्याण
डान्सबारमध्ये मजा करण्याच्या लागलेल्या सवयीची हौस पूर्ण करण्यासाठी घरफोडी करण्याकडे वळलेल्या उच्चशिक्षित रोशन जाधव (रा. निळजे) या चोरट्यास खडकपाडा पोलिसांनी अटक केली. त्याने पत्रकारितेचे उच्चशिक्षण घेतले असून काही वर्षे एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम देखील केले आहे. त्याच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आणत ४७ तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल, दोन घड्याळ असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
मोहने परिसरातील एका घरामध्ये भरदिवसा घरफोडी करुन सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरले होते. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. गेल्या महिनाभरात भरदिवसा घरफोडी करण्याच्या घटना परिसरात सतत घडत होत्या. त्याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. घरफोडी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही तसेच तांत्रीक कौशल्याच्या आधारे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ४८ तासात खडकपाडा पोलिसांनी शहाड येथून संशयिताला ताब्यात घेतले. रोशनकडे केलेल्या चौकशीत त्याने मोहने, आंबिवली, टिटवाला, शहापुर परिसरात दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली. घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असुन सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतीत दिवसा एकटा घुसुन घरफोडी करत होता.
हि कामगिरी ही पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार कॅचे, तपास अधिकारी सपोनि अनिल गायकवाड व तपास पथकाचे अंमलदार सहा.पो.उप.निरी. मधुकर दाभाडे यांच्यासह जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, पोहवा अशोक पवार, नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण, राजु लोखंडे, संदिप भोईर, योगेश बुधकर, सुधीर पाटील, पोशि राहुल शिंदे, अनंत देसले, कुंदन भांबरे, अविनाश पाटील यांच्या पथकाने केली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर