कल्याण
बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियम २०११ अनुसार वंचित व दुर्बल घटकांसाठी आरक्षित २५% जागांवर प्रवेश असून आरटीइतील २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरु असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात प्रथम फेरीतील प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (२) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक वगळून) मध्ये शाळांनी निश्चित केलेल्या प्रवेशस्तर वर्गात बालकांसाठी २५% प्रवेश राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत असून प्रथम फेरीमधील प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश प्रक्रीयेची सुरुवात आजपासून सुरु झाली असून पालकांना एसएमएसद्वारे अवगत होणार आहे.
पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता RTE PORTAL वर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी, निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश निश्चितीसाठी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांची तपासणी के. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक १, गांधीचौक, बारदान गल्ली, कल्याण पश्चिम या पडताळणी केंद्रामध्ये पडताळणी समितीकडून शासनाने निश्चित केलेल्या दिनांक १३ एप्रिल ते दिनांक २५ एप्रिल 2023 या कालावधीमध्ये (कार्यालयीन व शासकीय सुटीचे दिवस वगळून) विहीत मुदतीत करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users
या RTE PORTAL वर त्यांच्या लॉगीनमध्ये अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. सदर अलोटमेंट लेटर व प्रवेश प्रक्रीयेकरिता आवश्यक कागदपत्रे मुळ प्रतीसह छायांकित प्रतीचा दोन संच घेऊन पडताळणी केंद्रावर उपस्थित राहून पडताळणी समितीकडून दिनांक १३ एप्रिल ते दिनांक २५ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये कार्यालयीन व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) विहीत मुदतीत कागदपत्रांची तपासणकरण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी व्ही. व्ही. सरकटे यांनी केले आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर