December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

लठ्ठ रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण

मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश

कल्याण

लठ्ठपणाच्या आजाराने ग्रासलेल्या १०० किलो वजनाच्या ४० वर्षीय रुग्णावर नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात यश आले. यात रुग्णाला फॅटी लिव्हरचे निदान झाले जे पुढे जाऊन लिव्हर सिन्होसिस या गंभीर आजारास कारणीभूत ठरले. डॉक्टर अमृत राज, डॉ हिरक पहारी, डॉ अंबरीन सावंत आणि डॉ विक्रम राऊत, संचालक यांच्या नेतृत्वाखाली यकृत प्रत्यारोपण आणि एचपीवी शस्त्रक्रिया करण्यात आली. संजय मोटवानी असे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नाव आहे. मोटवानी हे केटरींगचा व्यवसाय करतात. त्यांच्या बैठ्या कामामुळे वाढत्या वजनाची समस्या सतावू लागली. त्यांचा लठ्ठपणा भविष्यात फॅटी लिव्हरला कारणीभूत ठरला ज्याने पुढे जाऊन यकृत सिऱ्होसिससारखे गंभीर रूप धारण केले.

जानेवारी २०१३ मध्ये त्याचे यकृताचे कार्य अचानक बिघडले. रुग्णाला कावीळ झाली होती आणि त्याला यकृताचा जुनाट आजार असल्याचे निदान झाले होते. सुरुवातीला रुणाला वैद्यकीय व्यवस्थापनावर ठेवण्यात आले होते परंतु उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या वाढल्या कावीळमुळे यकृताचे कार्य आणखी बिघडू लागल्याने डॉ विक्रम राऊत यांनी रुग्णाला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.

लठ्ठपणा ही सर्व आजारांची जननी आहे आणि त्यामुळे देशात मृत्यूचे आणि आजारपणाचे प्रमाण अधिक वाढते आहे. लठ्ठपणाचा आजार नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजच्या वाढत्या प्रसार आणि तीव्रतेशी जोडलेला आहे. वाढता बोडी मास इंडेक्ससह नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजची प्रकरणे वाढत आहेत. एनएएफएलडी मागील मुख्य घटक म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स जो लठ्ठपणामुळे होतो, संजपच्या बाबतीत यकृताचे नुकसान हे लठ्ठपणामुळे होणाऱ्या फॅटी लिव्हर रोगामुळे होते. अशा रुग्णांमध्ये यकताचा आजार वाढल्याने यकृत निकामी होते.

यकृत प्रत्यारोपणाशिवाय या रुग्णांमध्ये ६०-७०% मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या रुग्णांना तात्काळ पकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते आणि त्यांच्यासाठी प्रतीक्षा करणे जीवघेणे ठरते. संजयच्या सासन्यांनी यकृत दान केले. यकृताचा आकार, गुणवत्ता आणि शरीर रचना पासाठी त्यांचे तपशीलवार मूल्यमापन करण्यात आले आणि प्रत्यारोपणासाठी यकृताच्या उजव्या बाजूचा वापर करण्यात आला असल्याची माहिती यकृत प्रत्यारोपण आणि एचपीवी शस्त्रक्रिया संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी दिली.

तर फॅटी लिव्हरचे निदान झाले जे माझ्यासाठी धक्कादायक होते. मला कावीळ आणि सिऱ्होसिसचाही त्रास झाला. अशास्थितीत मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये प्रसंगावधान राखुन त्वरीत प्रत्यारोपणामुळे माझा जीव वाचला. यासाठी मी डॉक्टराच्या टीमचे आभार मानतो. मला माझ्या कुटुंबाचे, विशेषतः माझ्या सासऱ्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यानी मला त्यांचे यकृत दान केले. मी आता माझे दैनंदिनीं कार्य पुन्हा सुरू केल्याची प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.