December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ठाण्यात साजरा होणार MIDD season 2

एकाच छताखाली मिळणार बारा नृत्य प्रकार पाहण्याची पर्वणी 

ठाणे

कला, साहित्याला वाहिलेले उपक्रम भारावून त्यातून झालेला आर्थिक लाभ समाजासाठी दान करणारे खूपच कमी आहेत. ठाण्यातील “मिरियार्ड आर्ट “आणि “मुद्रा आर्ट अकादमी, ठाणे त्या मोजक्यांपैकी आहेत. २९ एप्रिल या आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसानिमित्ताने MIDD हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

रविवार, ७ मे रोजी रात्री ८ वाजता काशिनाथ घाणेकर सहभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. संपदा जोगळेकर, हर्षदा बोरकर, अदिती भागवत, जय सिंघ, अशिमिक कामठे ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा होणार आहे.

हा कार्यक्रम मिरीयार्ड आर्ट आणि मुद्रा आर्ट अकादमीच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे . श्रेयस देसाई, तेजश्री सावंत, प्रणाली निमकर आयोजित हा सोहळा समाजाला समर्पित केला आहे. या कार्यक्रमात मुंबई आणि ठाण्याचे १२ डान्स ग्रुप सेमी- क्लासिकल, वेस्टर्न हीप – होप, बॉलिवूड असे विविध १२ नृत्य प्रकार साधार करणार आहेत

या कार्यक्रमात जमा झालेला निधी ठाण्यातल्या दिव्याप्रभा या ४२ मुलींचे काळजी घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे. नृत्य चा माध्यमातून अशा प्रकारचा समजोपयोगी उपक्रम घेणारे मिरियर्ड आर्ट संयुक्त मुद्रा आर्ट अकादमी ही पहिली संस्था आहे.

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्ताने नृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या विवध संस्था, महाविद्यालये विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. एकाच छताखाली विविध प्रकारातील नृत्याचे सादरीकारण होतांना दिसत नाहीत. या अनोखा कार्यक्रमानिमित्त नृत्य प्रेमींना आणि प्रक्षकांना नृत्याचे विविध प्रकार एकाच मंचावर त्यातील बारकाव्यांसहित पाहता येणार आहेत.