December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

रग्बी स्पर्धेत एसएसटी महाविद्यालय तृतीय

उल्हासनगर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १७ व १९ वर्षाखालील रग्बी या खेळाची शालेय स्पर्धा नुकत्याच विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील एकूण आठ विभाग या स्पर्धेत सहभागी झाले होते .मुंबई विभागाकडून १९ वर्षाखालील वयोगटासाठी एसएसटी महाविद्यालयातील संघ सहभागी झाला होता. यात एसएसटी महाविद्यालय मुलांच्या संघाने या स्पर्धेत तृतीय स्थान पटकावले.

शालेय राष्ट्रीय स्पर्धा २०२२-२३ या वर्षात होणार नसल्यामुळे महाराष्ट्राचा संघ जाहीर न करताच खेळाडूंना चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच उल्हासनगर महानगरपालिका क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी, एसएसटी महाविद्यालयचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे आणि दिपक गवादे, तुषार वाकसे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार मार्गदर्शक प्रमोद पारशी आणि भूषण म्हात्रे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक,अन्य कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.