अंबरनाथ
येथील गावदेवी मैदानावर सकाळ संध्याकाळ वृद्ध चालायला येतात. युवा व बालक खेळायला येतात. परिसरात नगर पालिकेच्या वतीने विभिन्न प्रकारचे झाडं लावली आणि त्यांची जोपासना करीत आहेत. त्यातलं पिंपळाचे झाड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. परिसरातील अंधश्रद्ध लोकांची नजर या झाडावर पडली. झाडाला धाग्यादो-यांनी गुंडाळलं. फांद्यांना चिंध्या बांधल्या. झाडाचं दैवतीकरण सुरू केले.
या सर्व प्रकाराकडे अभाअंनिस चे ठाणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शिवा कमलापुरे यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मदतीने पिंपळवृक्षाची अंधश्रद्धेतून सुटका केली. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रकाश ढोकणे, महिला संघटीका निता डुबे, सानिका शेट्ये, सचिव दादाजी यशवंत, शिवा कमलापुरे, शैलेश सोनवणे, जगन्नाथ साबळे उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह