December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

रस्ता रुंदीकरणासाठी सह्यांची मोहीम

यु टाईप रस्ता रुंदीकरणासाठी सह्यांची मोहीम

कल्याण पूर्व विकास समितीची स्थापना

कल्याण

कल्याण पूर्व भागातील काटेमानवली नाका ते कोळसेवाडी रिक्षा स्टॅन्ड जवळील गणपती मंदिर पासून सिद्धार्थ नगर मार्गे तिसगाव हा यू टाईप रस्ता कित्येक वर्षांपासून रुंदीकरणाची प्रतीक्षा करत आहे. परंतु त्यास काही यश येत नाही. कल्याण पूर्वची लोकसंख्या साधारण साडेचार लाखाच्या पुढे गेली  आहे. परंतु त्या मानाने हा रस्ता खूप अरुंद आहे. त्यामुळे जनतेच्या आग्रहात्सव काही सामाजिक संस्था व सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन “कल्याण पूर्व विकास समिती” ची स्थापना केली आहे.

वेळोवेळी बैठका घेऊन सोमवारी सह्याच्या मोहिनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. व लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण करा होत नसेल तर इतर ही मार्ग काढा आम्ही साथ देऊ असे सांगितले. सोमवारी घेतलेल्या मोहिमेत 2530 लोकांनी सह्या केल्या आहेत.

यावेळी संजय निरभवणे, प्रशांत मोरे, विजय भोसले, प्रमोद दिवेकर, मनोज नायर, राम मोहिते, अंकुश राजपूत, भाऊसाहेब वावीकर, प्रवीण नांदोस्कर, श्रीनंद पाचधरे, रुपेश एखंडे, सुधीर रामराजे, गणेश पाबळे, संजय भालेराव, संदीप शेळके, भूपेंद्र पाटील, रमेश केदारे, संकेत शेळके, अशोक भोसले, प्रशांत कासारे, सुराळकर, प्रकाश पाटील, नितीन पवार, राधिका गुप्ते, मीनाक्षी आहेर, राधिका शिवणकर, सुरेखा गावंडे, पूजा सरदार, प्रेमा न्यायनीत, उर्मिला पवार, उमा बनसोडे, अनिता पाटील आदींसह इतर अनेक सभासद, नागरिक उपस्थित होते.