स्मारकाची दुरुस्ती करण्याची मनसेची मागणी
कल्याण
पश्चिमेतील दुर्गाडी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असून या स्मारकाची दुरावस्था झाली आहे. याबाबत मनसे शाखा अध्यक्ष महेश बनकर यांनी केडीएमसी आयुक्त आणि शहर अभियंत्यांना पत्र देत स्मारकची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज दुर्गाडी चौक येथील स्मारकाला गेल्या आठवड्यात गाडीने धडक दिल्याने तेथील तटबंदी तुटून संरक्षण जाळी खाली पडली आहे. तसेच काही लाईट बंद पडल्या आहेत. बरेच नुकसान झाले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या गाडीवर गुन्हा दाखल करावा. पुढील महिन्यात पावसाळा सुरु होत आहे म्हणून लवकरात लवकर या चौकातील स्मारकाचे महापालिकेच्या मार्फत दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी महेश बनकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह