उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे
जीवनदीप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
टिटवाळा
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी एक व्रत असते, त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते. या परीक्षेतील यशासाठी जिद्द, चिकाटी अथक परिश्रम आवश्यक असतात असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी केले.
कोकणविभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या संकल्पनेतून जीवनदीप महाविद्यालय, गोवेली येथे स्पर्धा परीक्षा दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन अभिजित भांडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी अभिजित भांडे पाटील यांनी स्वतः महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची परीक्षा कशी यशस्वी पार केली यांची कहाणी सांगत विध्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी प्रास्ताविक करून या शिबिराचा हेतू स्पष्ट केला व स्पर्धा परीक्षा किती महत्वाची आहे हे संगितले. तर मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी खेळातील राखीव जागेचा फायदा स्पर्धा परीक्षेसाठी कसा होतो हे सांगत विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. यावेळी रवींद्र घोडविंदे यांनी ही मार्गदर्शन केले.
तर उपस्थित दोनशे हुन अधिक विध्यर्थ्यांना महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या यशस्वींनी मोलाचं मार्गदर्शन केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. हरेंद्र सोष्टे, प्रा. देशमुख, प्रा. येगडे, प्रा. जाधव, प्रा. नरेश टेभे, प्रा. प्रकाश रोहने, प्रा तरे, प्रा. मगर यांच्या सह सर्वच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न