December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Sports: भगवान भोईर स्कूल अजिंक्य

डॉ. साळगावकर क्रिकेट स्पर्धा संपन्न

कल्याण

भगवान भोईर हायस्कूल (बीबीएचएस) संघाने मोहन क्रिकेट क्लब संघावर १७ धावांनी मात करत १२ वर्षांखालील मुलांच्या डॉ. साळगावकर क्रिकेट स्पर्धेचे विजेतपद पटकावले. केएफसीए क्रिकेट अकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत नंदकुमार सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीबीएचएस संघाने या स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता. आणि पहिल्याच प्रयत्नात या संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या वेळी युनियन क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख तुषार सामानी आणि भगवान भोईर शाळेचे मार्गदर्शक प्रशांत भोईर उपस्थित होते.

ही स्पर्धा शनिवारी पश्चिमेतील वायले नगर येथील युनियन क्रिकेट ग्राउंडवर पार पडली. या स्पर्धेत ठाणे, मुंबईसह अन्य शहरातील १६ संघांची सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बीबीएचएस संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद १४९ धावांचे लक्ष्य उभारले. सत्यनारायण घुगे याने ७४ धावा तसेच सन्मित कोथमिरे ३४ धावा करत संघाच्या धाव संख्येत मोलाचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहन सीसी संघाचा डाव १३१ धावांवर सिमित राहिला. मोहन सीसी संघातील वीर सचदेवने केलेल्या ३० धावा व अथर्व शिंदेच्या ३४ धावा वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली. अथर्वची झुंज एकली ठरली. अमर बिसु कर्मा याने २९ धावा ३ बळी व जितेश कुलकर्णी १३ धावा २ बळी मिळविले.

पाच सामन्यात १६८ धावा करणारा बीबीएचएस संघाचा सत्यनारायण घुगे सर्वोत्कृष्ट फलंदाज तर पाच सामन्यात दहा बळी घेणारा आर्यन पाटील हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याचबरोबर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण सन्मित कोथमिरे व अमर बिसू कर्मा यांची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती केएफसीए क्रिकेट अकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत सकपाळ यांनी दिली.