December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

सकल भारतीय समाजाच्या वतीने मोर्चा

कल्याण

राज्यात सर्वत्र जातीय दंगली घडवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे कुटील षडयंत्र प्रत्यक्षात येत आहे. अशावेळी जातीय धार्मिक सलोखा कायम ठेवून आपल्या तरूण युवकांवर गुन्हेगारीचा शिक्का बसून त्यांचे आयुष्य बर्बाद होवू नये याची काळजी व दखल महाराष्ट्र शासनाने व सकल भारतीय समाजाने घेणे आवश्यक आहे. या षडयंत्रामागील सुत्रधार शोधून गुन्हेगारांना शासन व्हावे. पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून आगरी, कोळी, बौद्ध, कुणबी, मराठा, मातंग, चर्मकार आदी सकल भारतीय समाजाच्या वतीने कल्याण प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

कल्याण येथील अल्पवयीन मुलावर झालेला हल्ला, नांदेड येथील अक्षय भालेराव खून, मुंबई येथील वस्तीगृहात विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा खून, लातूरचा गिरधारी तपलाघे खून अशाप्रकारे सतत खून बलात्कार, हल्ले घडण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रात सुरूच आहेत. हे पुरस्कृत अत्याचार मालिका थांबवण्या साठी कल्याणात सकल भारतीय समाजाच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे.

या मोर्चाच्या नियोजनासाठी सकल भारतीय समाजाच्या वतीने समाजसेवक अजय सावंत यांच्या पुढाकाराने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेक विचारवंतांनी आपली मते मांडली. सध्या ज्या जातीय दंगली घडविल्या जात आहेत. जाती जाती मध्ये भांडणं लावली जात आहेत यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत, त्यांचा शोध घेण्यात यावा, या आणि इतर मागण्यांसाठी येत्या 20 तारखेला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून याची जनजागृती करण्यासाठी वस्त्या वस्त्यांमध्ये बैठका घेण्यात येतील.

या बैठकीत प्रामुख्याने कामगार नेते शाम गायकवाड,  राजाराम पाटील, सुरेश पाटील, आगरी सेनेचे चंद्रकांत ठाणकर, ॲड. किरण चन्ने, बाळाराम कराळे, ॲड. जय गायकवाड, सुबोध मोरे, अण्णा रोकडे, ॲड. रोहित कांबळे, बाबा रामटेके, जगदीश धुमाल, अंकुश म्हात्रे, सुरेश म्हात्रे,  अण्णा पंडित, राजू रणदिवे, सुशील आरके, काळू कोमासकर,  ॲड. उमेश केदार, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. उदय रसाळ, सुजित पाटील, योगेश पाटील, मुकेश शेलार, सुरेश भंडारी, अनिल धनगर, सुशील मनोहर, संतोष जाधव, अनामिका महाले, वनिता गंभीराव, प्रज्ञा कांबळे, देवानंद कांबळे, रुपेश हुंबरे, दासू ठोंबे, प्रो.डॉ.अशोक बहीरव, चंद्रकांत गायकवाड, विनोद जाधव, वासनिक, सुजित जाधव, प्रवीण साळवे, विनोद कांबळे, रिना खांडेकर, प्रविण वाघ, डॉ.रवींद्र जाधव आदींसह ठाणे, रायगड जिल्ह्यामधील अनेक बौद्ध, आगरी, कोळी बांधव उपस्थित होते.

दोन्ही समाजाची सलोख्याची बैठक संपन्न झाली. आम्हा आगरी-कोळीबौद्ध बांधवांना तोडणाऱ्यांना व आमच्या मध्ये दंगल घडविण्याचा प्रयत्न करणा-यांना ही एक चांगली चपराक आहे. हेच या बैठकीचे फलीत म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया अजिंठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय सावंत यांनी दिली.