December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

खोखो संघात एसएसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

उल्हासनगर

एसएसटी महाविद्यालयातील खेळाडू विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी बजावत आपले आणि महाविद्यालयाचे नाव सगळीकडे झळकवत असतात. वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवत त्यांना अनेक संधीही उपलब्ध होत असतात. याच शृंखलेत नुकतीच भर पडली असून पुन्हा महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र यांच्या मान्यतेने महाराष्ट्राच्या खो खो संघात निवड झाली. महाराष्ट्र खो खोच्या १९ वर्षाखालील संघात मयुरेश मोरे, काजल शेख, कल्याणी कंक या एसएसटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली.

जून महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या खो खो स्पर्धांमध्ये हे खेळाडू महाराष्ट्र संघातून सहभागी होणार आहेत. त्यांच्या या उपलब्धी बद्दल सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या या निवडीचे श्रेय महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या खेळाच्या सोयी सुविधांना दिलेले आहे. या निवडीबद्दल खेळाडूंचे  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरस्वानी, आयक्यूएससी कॉर्डिनेटर डॉ.खुशबु पुरस्वानी, क्रीडा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.