December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन

कल्याणकर धावपटूंनी केली यशस्वी वेळेत पुर्ण

कल्याण : जगात सर्वात जुनी आणि प्रसिद्ध अशा दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन मध्ये यावर्षी 403 भारतीय धावपटूंनी भाग घेतला होता. त्यापैकी ऐतिहासिक कल्याण शहरातून संजय काळुखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरिष शहदादपुरी या ३ मॅरथोन पटुंची निवड झाली होती. या तिघांनीही अत्यंत अवघड मॅरॅथॉन विक्रमी वेळेत पुर्ण केली आहे.

संजय काळुखे यांनी ११.३८ तास, डॉ. सोमनाथ बाभळे ११.५३ आणि डॉ हरिष शहदादपुरी ११.३७ तास या वेळेत पुर्ण केली. हे तिघे गेले सहा महिने प्रसिद्ध धावपटू आणि प्रशिक्षक सतीश गुजराण यांच्या मार्गदर्शनाखाली खडतर प्रशिक्षण घेत आहेत. कॉम्रेडस मॅरॅथॉन रनर दिलीप घाडगे यांनी या घावपटूंना मोलाचे मार्गदर्शन केले. कॉम्रेडस मॅरॅथॉन अतिशय खडतर असते. ९० किमी अंतर १२ तासाच्या आत कुठेही न थांबतां पुर्ण करायचे असते. हि मॅरॅथॉन म्हणजे धावपटूंची शारिरीक व मानसिक क्षमतेची उच्चतम परिक्षा असते. या तिन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळींवर कल्याणचे नाव रोशन केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.