December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आरोग्य शिबिराने कचरा वेचक मजूर लाभांन्वित

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आयोजन

कल्याण

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत श्री महाकालेश्वर मंदिर वाडेघर कल्याण पश्चिम येथे आयोजित मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात 196 रुग्णांची यशस्वीरित्या तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 25 रुग्णांची जनरल तपासणी झाली. 21 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले, 75 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

वाडेघर आधारवाडी येथील डम्पिंगग्राउंड वर कचरा वेचणाऱ्या मजुरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर महाकालेश्वर मंदिरात संपन्न झाला. त्यावेळी बोलतांना स्थानिक डॉक्टर राजीव भोईर यांनी आपल्या विभागात गोरगरीब मजुरांसाठी एक देवदूत म्हणून निलेश सांबरे यांनी हा उपक्रम राबवून खरी जनसेवा केली आहे. असे उपक्रम इतर समाजसेवकांकडून राबवण्यात यावेत अशी अपेक्षा वर्तवली.

समाजसेविका आणि महाकालेश्वर ट्रस्टच्या अध्यक्षा संजीवनी पाटील यांनी आपले मंदिर हे दिन दलित गरजू नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी उपयोगी पडले हीच खरी ईश्वर सेवा असे म्हणत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आभार मानले. जिजाऊ सदस्य व स्थानिक समाजसेवक रुपेश पाटील यांनी कल्याण पश्चिम परिसरात आधारवाडी वाडेघर विभागात वर्षानुवर्ष डम्पिंग ग्राउंड मुळे प्रदूषित असलेल्या विभागत असा आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचे सर्व नागरिकांकडून कौतुक व्यक्त झाले.