December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंचा बोलबाला

कल्याण : झारखंड (रांची) येथे स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 4 थ्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये कल्याण मधील लोक कल्याण पब्लिक स्कूल मध्ये 8 वीमध्ये शिकणाऱ्या आस्था नायकर हिला पॉईंट टू पॉईंट 15 हजार किमी रेस मध्ये सुवर्णपदक मिळवत सर्वात जास्त 33 पॉईंट मिळवून तिने तामिलनाडू, वेस्ट बंगाल, कर्नाटक, बंगलोर अश्या सर्व खेळाडूंना मागे टाकत महाराष्ट्रला पाहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.

तसेच आस्था ने 42 किलो मिटर सतत 2 तास मॅरेथॉन करून तिथेही 6 वा क्रमांक पटकावला. तर कल्याणच्या सेंट मेरी हायस्कुल 8 वीमध्ये शिकत असलेल्या

देवांश राणे ह्याने सुद्धा 100 मीटर स्केटिंग इनलाईन प्रकारात ब्रॉंझे मेडल मिळवले. या दोघांनाही पवन ठाकूर व पुष्पेंन्द्र सिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.