April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

श्री त्रिविक्रम मंदिर

पेशवेकालीन श्री त्रिविक्रम मंदिर

कल्याण पश्चिमेतील पारनाक्याजवळ श्री त्रिविक्रमाचे भव्य मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ३५० वर्षांपूर्वीचे पेशवेकालीन आहे. पेशव्यांचे मेहेंदळे नावाचे सरदार उत्तरेच्या स्वारीवर गेले असताना कल्याणमध्ये परत येताना त्यांनी हि मूर्ती आपल्यासोबत आणली. उत्तम मुहूर्तावर छोटेखानी मंदिर बांधून तेथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली. संशोधकांच्या मते हि मूर्ती प्राचीन काळातील असून मंदिर हे पेशवेकालीन आहे.

या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे कि, त्रिविक्रम मूर्तीने दुष्टांत देऊन असे सांगितले होते कि, मी जेथे थांबेन तेथेच माझे मंदिर उभारावे. सरदार मेहेंदळे यांनी पारनाक्याजवळ एक व स्वतःच्या राहत्या वाड्याजवळ एक अशी दोन मंदिरे बांधून घेतली. स्वतः च्या वाड्याजवळ त्रिविक्रम मंदिरात या मूर्तीची स्थापना करण्याचा सरदार मेहेंदळे याचा मानस होता. पण  त्रिविक्रम मूर्ती सध्याच्या मंदिराच्या जागी पालखीतून आणताना रात्र झाली म्हणून काही काळासाठी ठेवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी ती उठेचना तेव्हा पारनाक्याचे मंदिर त्रिविक्रम मंदिर झाले.
अधिक माहिती पुढील भागात…