December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

सकल भारतीय समाजाच्या वतीने कल्याणमध्ये मोर्चा

समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सूत्रधारांवर कारवाईच्या मागणी

कल्याण

दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्या मनात शासनाविरोधात असलेला राग व्यक्त करण्यासाठी कल्याणात सकल भारतीय समाजाच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून प्रांत कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात समाजातील निरपराध तरूणांवर केलेल्या हल्ल्यातील आरोपीचा शोध घ्या, अत्याचार रोखन्यास असमर्थ ठरलेल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीनं देशद्रोही जाहीर करा यासारख्या आग्रही मागण्या करण्यात आल्या.

यात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या मोर्च्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून सुरवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, काळा तलाव, बेतूरकर पाडा, खडकपाडा ते प्रांत कार्यालयात जाऊन धडकला.

दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्या मनात शासनाविरोधात असलेला राग या मोर्च्याच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्रात आर एस एस पिढीत सरकारने समजा समाजामध्ये विकृष्ठ निर्माण केले आहे. धर्मंदांचे जहर पसरवला आहे. आज मणिपुर पेटला आहे. हे सरकार असच राहिले तर देश पेटेल. हे मानुवादांचे, विषमतेचे सरकार आहे. तमाम जनतेने एकत्र येऊन हे सरकार हटवले पाहिजे तरच अन्याय अत्याचार थांबेल अशी कळकळ कामगार नेते श्याम गायकवाड यांनी व्यक्त केली.

आगरी कोळी समाज ऐक्यासाठी मोर्च्यात सहभागी झाला आहे. फेक न्यूज पासरविणार्या खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याची मागणी आगरी कोळी समाजाकडून होत असल्याची प्रतिक्रिया आगरी कोळी नेते राजाराम पाटील यांनी दिली.

या मोर्च्यात कामगार नेते शाम गायकवाड, राजाराम पाटील, सुरेश पाटील, ॲड. किरण चन्ने, बाळाराम कराळे, ॲड. जय गायकवाड, अजिंठा फाउंडेशनचे अजय सावंत, सुबोध मोरे, अण्णा रोकडे, महादेव रायभोळे, सुनील खांबे, बाबा रामटेके, अण्णा पंडित, राजू रणदिवे, संदीप जाधव, महेंद्र गायकवाड आदींसह ठाणे, रायगड जिल्ह्यामधील अनेक बौद्ध, आगरी, कोळी बांधव सहभागी झाले होते.