कल्याण
पूर्वेतील यू टाईप रस्ताचे रुंदीकरण करण्यात येणार असून सुमारे 1800 लोकांच्या घरावर, उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या दुकानांवर बुलडोझर फिरविण्याची तयारी केडीएमसीने केली आहे. या रस्ता रुंदीकरणाबाबत हरकत नोंदवीण्यसाठी मुदतवाढ दिली नसल्याने हरकत नोंदविण्यासाठी भर पावसात नागरिकांना यावं लागत आहे. पालिकेच्या अशा अमानुष मानसिकतेचा या नागरिकांनी निषेध व्यक्त केला असून आज भर पावसात हरकत नोंदविण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात आले होते.
पालिकेने मुदतवाढ न दिल्याने अखेर शेकडो लोक हरकत, सूचना नोंदविण्या साठी महापालिकेत भर पावसात, काम धाम सोडून, मुलाबाळांची शाळा, कॉलेज वाऱ्यावर सोडून उपस्थित होते. यावेळी सुमारे 500 लोकांनी हरकती नोंदवत महापालिकेच्या अशा मानसिकतेचा विरोध नोंदवून निषेध केला असल्याची माहिती माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी दिली.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह