कल्याण
मोदी @९ या अभियाना अंतर्गत सेवा,सुशासन,आणि प्रगतीच्या वाटेने देश पुढे जात आहे. मोदींनी केलेल्या लोकोपयोगी योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांचे असून मोदींचे काम घरा घरात सर्व कार्यकर्त्यानी पोहचवले पाहिजे असे आवाहन माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.
मोदी@९ अंतर्गत केंद्र शासनाने अनेक लोकोपयोगी, समाजोपयोगी योजना मागील ९ वर्षात मोदी सरकारने राबविल्या असून देशभरातील करोडो नागरिकांना याचा फायदा झाला आहे. या योजनांची माहिती समाजातील घटकांना देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व सेल, आघाडी व मोर्चाचा संयुक्त मोर्चा संमेलनाचे आयोजन भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शहाड येथे संयुक्त मोर्चा संमेलन घेण्यात आले. विविध मोर्चांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून, प्रत्येक प्रभागाबरोबरच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोचविण्याचे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले.
यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, उपाध्यक्ष नाना सुर्यवंशी, महिला मोर्चा कल्याण शहर मंडळ अध्यक्षा ज्योती भोईर, महिला मोर्चा मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्षा मनीषा केळकर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, माजी नगरसेविका वैशाली पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद मुथा, संदिप पाटील, संमेलन प्रमुख मोहन कोनकर, राजेंद्र चव्हाण यांच्यासह संयुक्त मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध